माजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन
पुणे : विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेंदूमधून रक्तस्राव झाल्याने त्यांना येथिल खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
सातारा जिल्ह्यातील अोझर्डे येथील असलेले ना.स. फरांदे यांचे उच्च शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांनी धुळे व अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कोपरगावमध्ये प्राध्यापक असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला. अहमदनगर जिल्हा भाजपाचे ते अध्यक्ष होते.त्यानंतर त्यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही सूत्रे सांभाळली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेचे उपसभापती व सभापती ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली.