आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा
मुंबई : भीमा-कोरेगाव येथे घडलेली घटना हे एक षडयंत्र होते. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे, अशा सूचना देतानाच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिला.आज येथे भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
भीमा कोरेगाव येथे घडलेला हिंसाचार हे एक मोठे षडयंत्र होते. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी सर्वांना तिरंग्याखाली एकत्र आणून, जनतेमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी काम करावे असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. भाजप राज्यातील आणि केंद्रातील प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरु आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी करण्याबरोबरच, जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याच्या सूचना केल्या.
केंद्र आणि राज्यातील सरकारकडून होणा-या विविध विकास कामे बघून सरकारला बदनाम करण्याचा काही मंडळींचा डाव सुरू असल्याची टिका प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी करतानाच विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला येत्या २६ जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढून उत्तर द्या असे आवाहन केले. राषाट्रवादीच्या दुस-या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाचा समाचार घेताना विरोधकांचे हे हल्लाबोल आंदोलन अपयशी ठरली असेन, त्याचा कसलाही परिणाम होणार नाही.