कमला मीलच्या आगीसाठी मनपाच जबाबदार

कमला मीलच्या आगीसाठी मनपाच जबाबदार

मुंबई : कमला मीलमधील हॉटेल्सला आग लागून १४ निरपराध नागरिकांचा बळी जाण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपालांकडे केली. या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवावी आणि आयुक्तांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी स्पष्ट मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.

राजभवन येथे आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री नसीम खान, आ.प्रा. जनार्दन चांदूरकर, आ.सुनिल केदार. आ. अस्लम शेख, मुंबई महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आदींचा प्रामुख्याने समावेश होता. या शिष्टमंडळाने तब्बल ४० मिनिटे मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभाराची इत्यंभूत माहिती राज्यपालांना दिली.

यावेळी विखे पाटील म्हणाले की,  कमला मील कंपाऊंडमधील ‘मोजोज बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन हॉटेल्सला आग लागून १४ निरपराध नागरिकांचा बळी जाण्याच्या घटनेसाठी मुंबई महानगर पालिका जबाबदार आहे. मुंबई शहरातील सर्व अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम आणि तिथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची मुंबई महानगर पालिकेला संपूर्ण माहिती आहे. तरीही त्याविरूद्ध कारवाई केली जात नाही. आग लागलेल्या दोन्ही हॉटेल्समध्ये विनापरवाना हुक्का पार्लर चालविले जात होते. त्यांच्याकडे अनधिकृत व असुरक्षित बांधकाम करण्यात आलेले होते. ही बाब अग्नीशमन विभागाच्या अहवालातही नमूद करण्यात आली आहे.

Previous articleशेतकऱ्यांना आणि आम्हाला डिवचाल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही
Next articleमुंबईत उद्यापासून सरस महालक्ष्मी प्रदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here