बोंडअळी नुकसानग्रस्त कापुस उत्पादकांना एकरी ५० हजार भरपाई द्या

बोंडअळी नुकसानग्रस्त कापुस उत्पादकांना एकरी ५० हजार भरपाई द्या

मुंबई : गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफ, पिकविमा, कापूस बियाणे नियंत्रण कायदा अशा विविध माध्यमातून सरकारने हेक्टरी ३७ हजार ५०९ रुपयांची मदत जाहीर केली असली तरी संबंधीत यंत्रणांनी हात वर केल्याने कापूस उत्पादकांना एकरी दिड हजारापेक्षा अधिक मदत मिळणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने कापूस उत्पादकांना एकरी ५० हजार रुपये मदत स्वनिधीतून द्यावी व ती रक्कम संबंधीत यंत्रणांकडून स्वतंत्रपणे वसूल करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. बोंडअळीमुळे राज्यातील टक्के क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत फसवी असल्याचा आरोप मुंडे यांनी पत्रात केला आहे.शासनाने जाहीर केलेल्या तथाकथीत पॅकेजपैकी हेक्टरी ८ हजार रुपये पीक विमा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार होते. हेक्टरी १५ हजार रुपये हे कापूस बियाणे नियंत्रण कायद्याच्या माध्यमातून देण्यात येणार होते. वास्तविकत: चालू वर्षी खरीप हंगामात फक्त ५ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक उत्पादकांनीच पीक विमा घेतला आहे. त्यामुळे ३० लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या तथाकथीत पॅकेजमधील पीक विम्यापोटी मिळणाऱ्या ८ हजार रुपये प्रती हेक्टरी मदतीचा फायदा मिळू शकणार नाहीस हे  मुंडे यांनी लक्षात आणून दिले.
ज्या दिवशी शासनाने हे पॅकेज जाहीर केले त्याच दिवशी शासनाकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरला याची आकडेवारी उपलब्ध असतानाही सरकारने अशा पद्धतीची मदत जाहीर करुन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. सरकारचा खोटा डाव आता शेतकऱ्यांच्या लक्षात आला असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जगवण्यासाठी सरकारने आता स्वनिधीतून एकरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी व संबंधीत यंत्रणांकडून ती रक्कम स्वतंत्रपण वसूल करावी, असे मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे.

Previous article२६ जानेवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेसची संविधान बचाओ रॅली
Next articleज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची अट ६५ ऐवजी ६० ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here