औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून रामदास कदम यांना हटवले
मुंबई : औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील अंतर्गत वादामुळे औंरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून रामदास कदम यांची आज उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी दिपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने शिवसेना अंतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.
औरंगाबदचे पालकमंत्री रामदास कदम आणि औरंगाबदचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील असणारा वाद आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल खा. खैरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर आज औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून रामदास कदम यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मातोश्रीवरून याला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी डॅा. दिपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नांदेडच्या पालकमंत्रीपदी रामदास कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.