आप राज्यातील सर्व निवडणुका लढवणार

आप राज्यातील सर्व निवडणुका लढवणार

मुंबई  : आम आदमी पक्ष यापुढे राज्यातील विधानसभा, लोकसभेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे, अशी घोषणा आपचे नेते ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी आज केली.
येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपचे नेते ब्रिगेडीअर सुधीर सावंत बोलत होते.सावंत म्हणाले की, आप महाराष्ट्रात पक्ष बांधणी करीत असून, २३० विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सध्या राज्यात आपचे दहा हजार सक्रीय कार्यकर्ते आहेत. जुन्या नेत्यांसंदर्भात पक्ष निर्णय घेईलच; मात्र राज्यात नवे कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याचे काम चालु आहे. शिवराज्य पक्षातील हजारो कार्यकर्ते आपमध्ये सहभागी होत आहेत. लवकरच राज्याची कार्यकारणी जाहीर करण्यात येईल असेही सावंत यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढत होत आहेत. या आत्महत्या कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील, याकडे आप लक्ष देणार आहे. विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न लढवल्यामुळे आपचे कार्यकर्ते नाउमेद झाले होते. यापुढे पक्षाने राज्यातील आगामी सर्व निवडणूका लढवायच्या निर्णय घेतला असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.सावंत हे एकेकाळी राजीव गांधी यांचे जवळचे होते. राजापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी मधू दंडवते यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी बसपा मध्ये प्रवेश केला मात्र बसपामधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी शिवराज्य पक्षाची स्थापना केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी १२ छोट्या पक्षांची मोट बांधत तिसरी आघाडी स्थापन केली होती मात्र त्यात यश आले नाही. १२ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊ यांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज पहिल्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सर्व निवडणुका लढण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

Previous articleमहाराष्ट्र बिझनेस लिडर
Next articleप्रत्येक विभागात ५०० मे.वॉ सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here