नाशिक मध्ये भुजबळ समर्थकांची बैठक

नाशिक मध्ये भुजबळ समर्थकांची बैठक

नाशिक :  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या समर्थनार्थ २ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयांवर झालेल्या मोर्चानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी भुजबळ समर्थकांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठक शनिवार २०जानेवारी रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भुजबळ समर्थक समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

गेल्या २२  महिन्यांपासून जामिनासाठी छगन भुजबळांचा न्यायालयीन लढा सुरु आहे. केवळ आरोपांखाली अटक करून कारागृहात ठेवल्यामुळे मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जामीन मिळणे हा मुलभूत अधिकार असतांना सुद्धा आरोप व चौकशांचे सत्र  सुरु ठेवून त्यांना कारागृहात डांबून ठेवल्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाले आहे. त्यांची संपूर्ण राजकीय व सामाजिक कारकीर्द संपविण्यासाठी षडयंत्र आखले जात असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषामुळे २ जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय याठीकाणी निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात देशभरातील भुजबळ सर्मथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर आता पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून शनिवार २० जानेवारी रोजी नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील जयशंकर फेस्टिवल लॉन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीत पक्षभेद विसरून सर्व भुजबळ समर्थक एकत्र येणार आहे. यात विविध समाजाच्या संघटना व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीस भुजबळ समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून करण्यात आले  आहे.

Previous articleरिपब्लिकन पक्षाची  मुंबईत सामाजिक सलोखा रॅली 
Next articleकारवाई केलेल्या ठिकाणांची आयुक्त पुन्हा पाहणी करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here