सहनशीलता संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा

सहनशीलता संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा

नारायण राणेंचा इशारा

मुंबई : काँग्रेसला जय महाराष्ट्र करीत रालोआमध्ये गेलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांना चार महिने उलटूनही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने त्यांनी आज थेट मुख्यमंत्र्यानाच इशारा दिला आहे. माझी सहनशिलता संपण्यापूर्वी निर्णय घ्या असे राणे यांनी म्हटले आहे .

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. काॅग्रेसला पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा देवून चार महिन्याचा कालावधी उलटून गेला असतानाही त्यांना अद्याप मंत्रिपद देण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देवूनही राणे अजूनही प्रतीक्षेत आहेत. त्यांनी आज थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिला आहे. माझी सहनशिलता संपण्यापूर्वी निर्णय घ्यावा असे राणे यांनी म्हटले आहे .

राणे म्हणाले की, या कोकणातील नाणार प्रकल्पासह अन्य विषयावरही मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. माझी सहनशीलता संपण्याआधी निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडणार असल्याचे  त्यांनी सांगितले . आमदारकीचा राजीनामा दिल्या नंतर  राणे यांना भाजप कडून मंत्रिपदाची आशा होती . मुख्यमंत्र्यांनीही राणे यांचा योग्य सन्मान केला जाईल असे आश्वासन अनेकदा दिले आहे .मात्र राणे यांना मंत्रिपद काही अद्याप मिळाले नाही.
राणे यांच्या या इशाऱ्यानंतर आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे .

Previous articleधनंजय… या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा !
Next articleसर्वंकष आर्थिक विकासात देशात महाराष्ट्र अव्वल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here