…जेव्हा अजितदादा सिंहासन नाकारतात
उमरी ( नांदेड ) : राजकारणात जे काही करायचे ते खुर्चीसाठीच असत असं बोलल्या जात असल तरी अजितदादा पवार यांचा सारखा बडा नेता जेंव्हा चक्क सिंहासन नाकारतो तेव्हा मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
त्याचे असे झाले की , सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सभेसाठी अजितदादा आणि अन्य नेत्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. व्यासपीठावर मध्यभागी एक राजेशाही सिंहासनासारखी, महाराजा खुर्ची मांडली होती तर बाजूला साध्या खुर्च्या होत्या. स्थानिक नेत्यांनी दादा यांना त्या राजेशाही खुर्ची वर बसण्याचा आग्रह केला मात्र दादा यांनी तीथे बसण्यास स्पष्ट नकार देत ती महाराजा खुर्ची आधी उचला म्हणून आदेश दिला . दादांच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांनी ती खुर्ची हटवली आणि दादांनी साध्या खुर्चीवर बसने पसंद केले. दादांचा हा साधेपणा जमलेल्या हजारो नागरिक, पत्रकार यांना चांगलाच भावला.