मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डाओसला रवाना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डाओसला रवाना

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी रात्री उशीरा रवाना झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या सूचनेनुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेत सहभागी होणार आहेत. मुंबईत फेब्रुवारीमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदे होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येण्याच्या दृष्टीने डाओसमधील परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करणार आहेत.

Previous article…जेव्हा अजितदादा सिंहासन नाकारतात
Next articleसरकारचा पायगुणच चांगला नाही राज्यात नुसत्या अळयाच अळया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here