मनोहर जोशी, सुधीर जोशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत ?

मनोहर जोशी, सुधीर जोशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत ?

मुंबई : शिवसेना कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक उद्या वरळी येथिल सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये होणार असून, या बैठकीत युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना नेतेपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. तर ज्येष्ठ नेते बैठकीत मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना पक्षाचे मार्गदर्शक बनविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्या होणा-या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मनोहर जोशी, लीलाधर डाके, गजानन कीर्तिकर आदी नेते उपस्थित होते. मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके आदी नेत्यांवर पक्षाचे मार्गदर्शकपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांना आणि गटनेते अनिल परब यांनाही शिवसेनेचे नेतेपद देण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले समजते.

Previous articleमुख्यमंत्री मंत्री कर माय…मुख्यमंत्री मंत्री कर माय
Next articleशेतक-याला सातबारा सोबत पतंजलीचा काढाही घ्यावा लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here