कुठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा

कुठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा

मुंबई : मंत्रालयात धर्मा पाटील या शेतक-याने आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न,यवतमाळ येथे फवारणीमुळे शेतक-यांचा झालेला मृत्यु हा शेतक-यांनी किटकनाशक वापरण्याचे प्रमाण पाळले नसल्याने झाला असल्याचा निष्कर्ष विशेष तपास पथकाने दिल्याने हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी करतानाच कुठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा अशी टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली.

यवतमाळ येथे फवारणीमुळे ४० शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने शेतक-यांचा मृत्यु हा किटकनाशक फवारणीचे प्रमाण पाळले नसल्याने झाल्याचा निष्कर्ष दिला आहे. हा अहवाल सरकारने मागे घ्यावा असे सांगत, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देवून हा अहवाल देणा-यांना बडतर्फ करा अशी मागणी विखे यांनी केली.या प्रकरणात दोषी औषध कंपन्यांवर कसलाही गुन्हा दाखल केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करून कुठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा अशी टिका त्यांनी सरकारवर केली.

Previous articleराष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला दोन हजार किमीचा प्रवास !
Next article  पर्यावरणस्नेही शहरांसाठी राज्यात यंत्रणा उभारणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here