मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील यांचे निधन

मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील यांचे निधन

मुंबई :संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. या ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी अखेर जे.जे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतक-याचा दर्जा देण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात मिळत नाही तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्विकारणार नसल्याचे त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरण येथिल शेतकरी धर्मा पाटील यांनी गेल्या २२ तारखेला रात्री उशीरा मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यांच्यावर जे.जे रुग्णालयात गेल्या काही दिवसापासून उपचार करण्यात येत होते. या दरम्यान त्यांचे डायलिसीस करण्यात आले होते. धर्मा पाटील यांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येणार आहेत. जमिनीचा योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्विकारणार नसल्याची भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.

Previous articleराज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून भीमा कोरेगाव घटनेवर भाष्य
Next articleमहामंडळावरील नियुक्त्या लवकरच !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here