फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे

फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे

मुंबई : शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात विषप्राशन केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनानंतर विरोधकांनी सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. एक प्रकारे धर्मा पाटील यांची ही हत्याच केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे.

धुळे जिल्ह्यातील वृध्द शेतकरी धर्मा पाटील यांची शेतजमीन सरकारने उर्जा प्रकल्पासाठी ताब्यात घेतलीहोती मात्र, या जमीनीला सरकारी भावाने मोबदला देण्यात आला. या अन्यायाविरोधात धर्मा पाटील हे गेली दोन वर्ष लढा देत होते. गेल्याच आठवड्यात त्यांनी मंत्रालयात विषप्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जे.जे रूग्णालयात ठेवण्यात आले होते. काल रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीका केली आहे. ‘जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुध्दा सरकारवर टीका करीत ‘सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले. या सरकारचा धिक्कार असून धर्मा पाटील यांच्या निधनासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे. अशी प्रतिक्रिया ट्विटरवरून व्यक्त केली आहे. संबंधितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Previous articleमहामंडळावरील नियुक्त्या लवकरच !
Next articleशिवसेनेशिवाय भाजपचे किती खासदार निवडून येतात ते पाहू !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here