सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे

सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे

अशोक चव्हाण

मुंबई : जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधननंतर विरोधकांनी सरकारवर टिकास्त्र सोडले असतानाच काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकार विरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे.

धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे असून, सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी प्रतिक्रिया काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleशिवसेनेशिवाय भाजपचे किती खासदार निवडून येतात ते पाहू !
Next articleधर्मा पाटील यांचा मृत्यू ही हत्याच, सरकारच्या क्रूरतेचा हा बळी