बीडीडी चाळीत ३० वर्षांपासून राहणाऱ्या पोलिसांना म्हाडाची घरे

बीडीडी चाळीत ३० वर्षांपासून राहणाऱ्या पोलिसांना म्हाडाची घरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : बीडीडी चाळीत ३० वर्षापासून राहणाऱ्या पोलीसांना घरे तयार झाल्यावर हस्तांतरित करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला दिले.

ते आज मंत्रालयात आयोजित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत बैठकीत बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बीडीडी चाळीत गेल्या ३० वर्षांपासून जवळपास २ हजार ९५० पोलीस कुटुंबीय राहतात. म्हाडाची घरे तयार झाल्यावर त्यापैकी २ हजार ९५० घरे गृह विभागाला हस्तांतरित करावीत. घरे देताना त्याचे निकष काय असावेत, याचा निर्णय गृह विभागाने घ्यावा. १९९६ नंतर बीडीडी चाळीत अनधिकृत राहणाऱ्या कुटूंबांना काही दंड आकारुन त्यांनाही नियमित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली तसेच म्हाडाची घरांची कामे तातडीने सुरु करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.या बैठकीला मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous articleभाजपचे मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया
Next articleविरोधकांचे सर्व आरोप बिनबुडाचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here