प्रमोद डोईफोडे यांची कार्यवाहपदी निवड
मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक निवडणूकीत दै.पुढारीचे दिलीप सपाटे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर ; मुंबई नगरी वेब पोर्टलचे प्रमोद डोईफोडे कार्यवाहपदी विक्रमी मतांनी विजयी झाले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पार पडलेल्या वार्षिक निवडणूकीत दै.पुढारीचे दिलीप सपाटे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर ; मुंबई नगरी वेब पोर्टलचे प्रमोद डोईफोडे हे कार्यवाहपदी विक्रमी मतांनी विजयी झाले. प्रमोद डोईफोडे यांना ७१ मते मिळाली त्यांनी दै. पुढारीचे संदेश सावंत यांचा पराभव केला. संदेश सावंत यांना ४९ मते मिळाली. उपाध्यक्षपदी दै.कृषीवलचे दिलीप जाधव विजयी झाले त्यांना ४६ मते मिळाली. त्यांनी फ्रि प्रेसचे विवेक भावसार यांचा पराभव केला. विवेक भावसार यांना ३७ मते मिळाली.उपाध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. दै.तरूण भारतचे प्रविण राऊत यांना २३ तर; दै.लोकाशाचे राजू झनके यांना १५ मते मिळाली. दै. लोकशाही वार्ताचे महेश पवार यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
कार्यकारिणी सदस्यपदी दै.देशोन्नतीच्या नेहा पुरव ( ७० मते), अॅग्रोवनचे विजय गायकवाड (६४ मते), अॅग्रोवनचे मारुती कंदले ( ६४ मते), दै.लोकमतचे गौरीशंकर घाळे ( ६२ मते), दै.नवभारतचे ब्रिजेश त्रिपाठी ( ६१मते) हे विजयी झाले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन पारकर यांनी काम पाहिले.