येत्या मंगळवारी दोन्ही काॅग्रेसची महत्वपूर्ण बैठक !

येत्या मंगळवारी दोन्ही काॅग्रेसची महत्वपूर्ण बैठक !

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीत पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर आता राज्यात काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली असून, येत्या मंगळवारी होणा-या या बैठकीत सरकारच्या विरोधात मोट बांधण्याबरोबरच आगामी निवडणूका आघाडी करून लढण्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारच्या विरोधात एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काॅग्रेससह सर्वच विरोधीपक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. त्याच धर्तीवर राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याबरोबर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी येत्या मंगळवारी म्हणजेच ६ फेब्रुवारीला काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा पूर्व आढावा या बोलावली बैठकीत घेतला जाणार आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने काॅग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.दोन्ही पक्षानी मिळून नुकतीच संविधान बचाव रॅली काढली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचे सुतोवाच केले होते . त्यानुसार पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे.

Previous articleअर्थव्यवस्थेची कासव छाप अगरबत्ती झाली
Next articleऔरंगाबाद मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सरकारवर करणार ” हल्लाबोल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here