मंत्रालयाच्या दारात धर्मा पाटलांची ” रांग “

मंत्रालयाच्या दारात धर्मा पाटलांची ” रांग “

मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी जमीनीचा मोबदला मिळावा या साठी मंत्रालयात विषप्राशन करून आपले जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच ” धर्मा पाटील” याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यात मंत्रालयातील पोलीसांना यश आले आहे.

अणू उर्जा प्रकल्पातील जमीनीला योग्य मोबदला मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील ८० वर्षाचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन केले होते.जे.जे.रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. ही घटना ताजी असतानाच आज धर्मा पाटील यांच्या घटनेची पुनरावृत्ती टळली.मारुती सदाशिव धावरे वय २८ वर्षे रा.मु पो सांगवी जि.सोलापूर या तरूण शेतक-याची पोलीसांनी मंत्रालयात प्रवेश करताना तपासणी केली असता त्याच्याकडे टायगोर हे कीटकनाशक आढळल्याने मंत्रालय प्रवेशद्वारावर तैनात असलेले पोलीसांना धक्काच बसला. पोलीसांनी त्वरीत हे कीटकनाशक ताब्यात घेवून, टळली.मारुती धावरे या तरूण शेतक-याची चौकशी केली असता . शेतातील ऊस घेवून जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतातील उभे पीक जाळावे लागते.या संदर्भात सरकारी यंत्रणेकडे दाद मागूनही त्याची समस्या न सुटल्याने त्याने त्यानंतर मंत्रालयात येवून अनेकदा दाद मागितली. मात्र या तरूण शेतक-याने आज धर्मा पाटील यांच्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला मात्र वेळीस पोलीसांनी झडती घेवून कीटकनाशक ताब्यात घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

राज्यातील शेतकरी आपल्या समस्या स्थानिक सरकारी यंत्रणेकडे मांडत असतानाही त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याने हताश शेतकरी आता आपल्या व्यथा थेट मंत्रालयात मांडताना दिसत आहे.यामध्ये प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मंत्रालय सुरक्षेवर असलेल्या पोलीसांवर मोठा ताण पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक पिडीतांनी न्यायासाठी गृह विभागाकडे निवेदन देवून थेट आत्महत्येचा इशारा दिला असल्याचे समजते.

धर्मा पाटील यांची पुनरावृत्ती टळली असली तरी आज दुपारी पुन्हा एक वृध्द शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत मंत्रालयाच्या दारात उभे राहिल्याचे दिसले.उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरमकुंडी गावातील राजाराम गायकवाड यांची अर्धा एकर जमीन आणि घर महामार्गात गेले आहे. स्थानिक दलालांनी आपणाला त्रास देणे सुरू केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. अखेर न्याय मिळवण्याच्या आशेने मंत्रालयाच्या दारात आलो असल्याचे ते म्हणाले.

Previous article‘आयुष्यमान भारत’ योजना म्हणजे मोदी सरकारचा अजून एक ‘जुमला’:
Next articleव्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या “त्या” भरतीच्या जाहिराती बोगस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here