राष्ट्रवादीच्या हल्लाबोलमुळे औरंगाबाद शहर दणाणून गेले
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह हल्लाबोल मोर्चा विभागीय कार्यालयावर धडकला..
औरंगाबाद : राज्य सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या मोर्चाला औरंगाबादच्या क्रांती चौकापासून सुरुवात झाली . न भूतो न भविष्यती असा हा भव्य मोर्चा सरकारच्याविरोधात घोषणा देत औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर येवून धडकला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकर्त्या भाजप-शिवसेना सरकारच्याविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. मराठवाडयातील ८ जिल्हयात सलग ९ दिवस प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली विराट अशा सभा पार पडल्या. या हल्लाबोल सभांना जनतेने अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. प्रत्येक जिल्हयात जनतेने सरकारच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आणि राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनामध्ये सहभागी झाले.
या मोर्चानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चाने राष्ट्रवादीचे नेते सभास्थळी दाखल झाले.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाने औरंगाबाद शहर दणाणून गेले होते.अक्षरश: औरंगाबाद शहर राष्ट्रवादीमय होवून गेले होते.
या मोर्चात पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे,विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,गटनेते जयंत पाटील,विजयसिंह मोहिते पाटील,डॉ.पद्मसिंह पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक,माजी मंत्री राजेश टोपे,माजी मंत्री भास्कर जाधव,जयदत्त क्षीरसागर,हसन मुश्रीफ,माजी मंत्री अनिल देशमुख,खासदार माजिद मेमन,खासदार धनंजय महाडिक,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,कोषाध्यक्ष आणि आमदार हेमंत टकले,पक्षाचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे,आमदार जितेंद्र आव्हाड, आदींसह पक्षाचे वरीष्ठ नेते, खासदार,आमदार सहभागी झाले आहेतच शिवाय मराठवाडयातील पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी,शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.