मीरा भाईंदरच्या आयुक्तपदी बी. जी. पवार

मीरा भाईंदरच्या आयुक्तपदी बी. जी. पवार

मुंबई : राज्य शासनाने आज तीन सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, मीरा भाईंदरचे आयुक्त डाॅ.नरेश गिते यांच्या जागी बी. जी. पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मीरा भाईंदरचे आयुक्त डॉ. नरेश गिते यांची नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांची वित्त विभागाचे प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात नेमणूक करण्यात आली आहे.

Previous articleमुंबई महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा
Next article…तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का?