जाणीवपूर्वक काही ठरविले असेल तर न्याय मिळत नसतो

जाणीवपूर्वक काही ठरविले असेल तर न्याय मिळत नसतो

माजी मंत्री एकनाथ खडसे

भुजबळ समर्थकांनी घेतली माजी मंत्री एकनाथ खडसेंची भेट

मुंबई : एकाद्या व्यक्तीविषयी जाणीवपूर्वक काही ठरविले जात असेल तर त्याला न्याय मिळत नसतो अशा भावना राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भुजबळ समर्थकांकडे व्यक्त केल्या. छगन भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अन्याय पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहे. त्यासंदर्भात आज भुजबळ समर्थकांनी राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुंबई  येथे बी ३ या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बापू भुजबळ, आ.जयवंतराव जाधव, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक,जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,कैलास मुदलियार, योगेश कमोद, संदीप सोनवणे, भालचंद्र भुजबळ, श्रीराम मंडळ,समाधान जेजुरकर, नरेंद्र सोनवणे यांनी छगन भुजबळांवर अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलतांना माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले की, छगन भुजबळ हे वर्षानुवर्ष बहुजन समाजासाठी काम करणारे नेते असून त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का भोगावी असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले की एकाद्या व्यक्ती विषयी जाणीवपूर्वक काही ठरविले जात असेल तर त्याला न्याय मिळत नसतो. मात्र भुजबळ समर्थकांनी सुरु केलेल्या अन्याय पे चर्चेमधून समाजामध्ये जागृती निर्माण होईल. तसेच भुजबळांना कायद्याच्या चौकटीत न्याय मिळायला हवा अशा भावना त्यांनी भुजबळ समर्थकांकडे व्यक्त केल्या.

मी भुजबळांसोबत

आमदार भाई जयंत पाटील

भुजबळ समर्थकांनी शेकापचे नेते आ.भाई जयंत पाटील यांची देखील भेट घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी मी छगन भुजबळ यांच्या सोबत असून मुंबईत होणाऱ्या आंदोलनास सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी भुजबळ समर्थकांना दिले.

Previous articleसमाज माध्यमांतून महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार
Next articleशेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here