अखेर तुकाराम मुंढे यांची बदली
मुंबई दि. ७ पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांची नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
राज्य शासनाने आज सहा सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक तुकाराम मुंढे यांनी आपल्या विभागात शिस्तीचा बडगा उगारला असतानाच त्यांची आज नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली केली आहे. त्यांची जागी नैना गुंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. महानंदच्या व्यवस्तापकिय संचालकपदी दिपककुमार मीना यांची नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्तापकिय संचालक के,व्ही. कुरंदकर यांची मंत्रालयात पदुप विभागात सचिव म्हणून नेमणूक केली आहे. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक क्रिष्णा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सह व्यवस्थापकिय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात उपसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.