एक दिवस सर्वांना दिल्लीत पकोडे तळण्याची वेळ येईल !

एक दिवस सर्वांना दिल्लीत पकोडे तळण्याची वेळ येईल !

मुंबई : काश्मीरमध्ये रोज जवान शहिद होत असताना आपण येथे पकोड्याबाबत चर्चा करीत आहोत. ही बाब गंभीरतेने न घेतल्यास एक दिवस सर्वांनाच दिल्लीत पकोडे तळण्याची वेळ येईल, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

युवकांनी पकोडे विकून बेरोजगारीवर मात करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकस्तरातुन निषेध करण्यात आला. शिवसेनेनेही मोदींच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. काश्मीरमध्ये रोज जवान शहिद होत आहेत. आणि येथे पकोड्याबाबत चर्चा सुरू आहे. ही बाब गंभीरपणे न घेतल्यास एक दिवस सगळ्यांनाच दिल्लीमध्ये पकोडे तळण्याची वेळ येईल, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.

Previous articleकश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला
Next articleकाॅग्रेसच्या आंदोलनामुळे मंत्रालयाचे रूपांतर पोलीस छावणीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here