९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
मुंबई : येत्या २६ फेब्रूवारीपासुन राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून, ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात सादर केला जाणार आहे.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन येत्या २६ फेब्रूवारीपासून सुरू होत असून, आज कामकाज संल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडली. येत्या २६ फेब्रूवारीपासुन सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ मार्च पर्यंत चालणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सभागृहात सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर हे विधानपरिषदेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.