तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराचे उद्या वितरण
मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ तमाशा कलावंत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तमाशा कलावंत मधुकर नेराळे यांना जाहिर करण्यात आला आहे.रु.५लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराचे प्रदान मागील वर्षीच्या पुरस्कारप्राप्त तमाशा कलावंत श्रीमती राधाबाई खोडे-नाशिककर यांच्या हस्ते होणार आहे.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरसमोर उद्या ९ फेब्रुवारी,२०१८ रोजी सायंकाळी ६ वा. हा कार्यक्रम होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंजुषा चंद्रकांत जाधव, महापौर जयवंत सुतार, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, खासदार राजन विचारे, आमदार नरेंद्र पाटील,आमदार श्रीमती मंदा म्हात्रे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर तमाशा ढोलकीफड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तमाशा फडाचे हे कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येतील.