मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या तरूणाचा मृत्यू
मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारणारा हर्षल रावते या तरूणाचे उपचारादरम्यान जे.जे रूग्णालयात मृत्यू झाला आहे.
मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारणारा हर्षल रावते यांचे उपचारादरम्यान जे.जे रूग्णालयात मृत्यू झाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री विजय शिवतारे हे जे.जे रूग्णालयात आहेत. हर्षल सुरेश रावते (वय ४४, चेंबूर, मुंबई) असे या तरुणाचे नाव आहे. सामान्य प्रशासन विभागात कामासाठी तो आला होता. मात्र, नैराश्यातून त्याने ५व्या मजल्यावरुन उडी घेतली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.