सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली
नवाब मलिक यांची सरकारवर टिका
मुंबई : लोक मंत्रालयात येवून आत्महत्या करत आहेत याचा अर्थ हे सरकार जनतेला न्याय देवू शकत नाही.सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
ज्याप्रकारे हर्षल रावते याने मंत्रालयामध्ये येवून इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.काल एका तरुणाने स्वत:वर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.तर धर्मा पाटील यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.ही गंभीर परिस्थिती आहे. सरकार लोकांना न्याय देवू शकत नाही. मंत्री सगळे अधिकार आपल्याकडे ठेवत आहेत आणि अधिकारी निर्णय घेत नाहीत. सरकारने वेळीच जागे झाले पाहिजे अन्यथा ही परिस्थिती चिघळू शकते असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.