मराठा समाजाच्या विराट दर्शनासमोर सरकार नतमस्तक

मराठा समाजाच्या विराट दर्शनासमोर सरकार नतमस्तक

मुख्यमंत्री

मुंबई : महाभारतात श्रीकृष्णाने विराट रूपाचे दर्शन दिल्यावर जशी श्रुष्टी नतमस्तक झाली त्याप्रमाणे मराठा मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या विराट दर्शनासमोर सरकार नतमस्तक झाले असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.मराठा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

अनेक वर्षे मराठा तरुण अस्वस्थ होते. त्यामुळे मराठा समाजाचे अभूतपूर्व मोर्चे निघाले. “महाभारतात श्रीकृष्णाने विराट रुपाचं दर्शन दिल्यावर जशी सृष्टी नतमस्तक झाली, त्याप्रमाणे मराठा मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या विराट रुपाचे दर्शन झाले. सरकार या रुपापुढे नतमस्तक झाले. त्यामुळे सरकारने अनेक निर्णय घेतले. असे मुख्यमंत्री म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देऊन जेवढा दिलासा मिळाला असता त्यापेक्षा अधिक सवलती सरकार देत असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मराठा समाजाच्या विविध संस्था आणि संघटनाना समाजाच्या विकासासाठी मध्यस्थ म्हणून अधिकृतपणे नेमण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दाखवली.

Previous article” गोवा फेस्टीवल २०१८ ला” मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleलोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गोवा फेस्टीवल २०१८चा समारोप