लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गोवा फेस्टीवलचा २०१८ समारोप
मुंबई : दोन दिवसीय गोवा फेस्टिवल २०१८चा लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने शानदार समारोप करण्यात आला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यात गुटगुटीत बालक स्पर्धा , पाकस्पर्धा , टॅलेन्ट स्पर्धा, संगीत कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले होते तसेच नाट्य संगीत क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणा-या अरविंद पिळगावकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी अरविंद पिळगावकर म्हणाले मी नाटक क्षेत्रात काम करताना संगीताची नाळ न तोडता मी सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. मला चांगले गुरू लाभले म्हणून मी आज चांगला घडू शकलो म्हणून आजच्या पिढीनी नाटक व संगीत क्षेत्रातील माहिती केवळ इंटरनेट वरून न घेता त्याचा सखोल अभ्यास करावा असे युवा पिढीला त्यांनी मार्गदर्शनपर सांगितले तसेच त्यांनी गोवा फेस्टिवल आयोजित करून नवोदित उदयोजीकाना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील कामगिरीला शुभेच्छा दिल्या.
दोन दिवसीय गोवा फेस्टिवलला गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा खूप चांगला प्रतिसाद लाभला . ह्यावर्षी अंदाजे वीस हजारापेक्षा जास्त लोकांनी भेट देऊन गोवंन फूडचा आस्वाद घेतला व गोव्याच्या विविध वस्तू विकत घेण्याचा आनंदही घेतला. गोवा म्हणजे मासांहार व मद्य असा लोकांचा समज असतो परुंतु तसे नसून शाकाहारी मध्ये ही गोव्याच्या पदार्थांची खूप विविधता आहे असे आम्ही गोयांकारचे सचीव संजय हेगडे यांनी सांगितले तसेच पुढील वर्षी यापेक्षा व्यापक प्रमाणात कार्यक्रम करण्याचा आमचा मानस असून मुंबईच्या बाहेर जिथे गोवंन लोकवस्ती आहे तिथीही गोवा फेस्टिव्हलचे आयोजन करून तेथील लोकांनाही व्यासपीठ निर्माण करून देण्याचा आमचा निर्धार आहे.