टाळ-मृदुंगाच्या गजरात भाजपाच्या गरीब रथाची सुरूवात
तुमच्या हक्काच्या घराची माहिती घेऊन आम्ही तुमच्याशी थेट संवाद साधायला आलोय
– मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार
मुंबई : मुंबईतील सामान्य माणसाला हक्काचे घर मिळावे आणि मुंबईतून बाहेर जाण्याची वेळ येऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला व २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मुंबईत मिळणार आहे. तुमची माहिती आम्ही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे पोहचवू असा ग्वाही देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी गरीब रथ यात्रेला आज सुरूवात केली. योवळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेताही उपस्थित होते. तर वारक-यांच्या टाळ-मृदुगांच्या गरजात या रथाची यात्रा आजपासून सुरू झाली.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आता मुंबईतील २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार आहेत. याची माहिती देण्यासाठी व अशा पात्र रहिवाशांची माहिती एकत्र करण्यासाठी मुंबई भाजपातर्फे येत्या आठवडाभरात मुंबईत गरिब रथ तयार करून रथयात्रा काढण्यात आली आहे. आज काळाचौकी येथील जिजामाता नगर येथे या गरिब रथाचे उद्धाटन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वारक-यांनी केलेल्या टाळ मृदुंगाचा गरजरातच रथाची यात्रा सुरू करण्यात आली. या यात्रेच्या निमित्ताने आमदार अॅड आशिष शेलार मुंबईतील झोपडपट्यांमध्ये जाऊन जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. अशा मुंबईत १२ छोटया छोटया सभा होणार असून त्यातील पहिली सभा आज जिजामाता नगर येथे झाली तर दुसरी सभा भायखळा वॉर्ड क्रमांक २०७ येथे झाली.
यावेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी मुंबई भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी सतत पाठपुरावा करून हा निर्णय घेण्याची विनंती सरकारला केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कायदा केला व निर्णय घेतला. आता त्याच पध्दतीने सामान्य माणसाच्या हिताचे गृहनिर्माण धोरण सरकार तयार केरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तर यावेळी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, माझे बालपण याच गिरणगावात गेले. मी चाळीत राहणा-या छोटया छोटया घरात राहणा-या व्यथा जाणतो. म्हणूनच मी भाजपा सरकार आल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या घराचे प्रश्न घेऊन सरकारकडून ते सुटावे म्हणून प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना घर मिळावे अशी मागणी आम्ही केली. आजपर्यंतच्या कुठल्याही सरकारने घेतला नाही असा मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ज्यांचे २००० पुर्वीचे घर आहे त्यांना पुर्नविकासात घर मिळेलच. पण २००० ते २०११ पर्यंतचे ज्यांच्याकडे पुरावे आहेत अशा झोपडपट्टीधारकाला आतापर्यंत अपात्र ठरवले जात होते आता या निर्णयामुळे त्यालाही घरे मिळतील. पंतप्रधान आवास योजनेमध्ये ही घरे मिळणार असून बांधकाम खर्चात ही घरे उपलब्ध होणार आहेत. म्हणून ही रथयात्रा आपल्यापर्यंत येते आहे. तुम्ही दिलेली माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही घेऊन जाऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. अंदाजे या निर्णयामुळे मुंबईतील १८ लाख मुंबईकरांना हक्काची घरे मिळणार आहेत. त्यासाठीच आम्ही थेट संवाद साधण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत, असे सांगत आमदार अॅड आशिष शेलार यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधला. यावेळी भाजपाचे संघटनमंत्री सुनिल कर्जतकर, मुंबई उपाध्यक्ष विनायक कामत, जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ गमरे, राजन घाग, अरूण दळवी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. तर भायखळा येथेही जोरदार सभा झाली त्याला रहिवाशांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.