मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोंदींवर निशाणा !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोंदींवर निशाणा !

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “अहो कधीतरी आमच्याही छकुल्याचे ( मोदी यांच्या योजना ) कौतुक करा ना” असे पंतप्रधान मोदी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
यांना म्हणत आहेत तर “मोदीजी ,नक्की केले असते पण त्यात नुसताच पेंढा भरलाय….असे उत्तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देत आहेत असे व्यंगचित्र रेखाटले आहे.

आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फटकारे ओढले आहेत. पंतप्रधान मोदी हे एक बाबा गाडीत ” मोदींच्या योजना” घेवून पुढे जात असल्याचे रेखाटले आहे.तर दुस-या बाजूला त्यांच्या पाठीशी भाजपाध्यक्ष अमित शहा आपल्या शबनममध्ये “जुमला” घेवून पाठराखण करीत असल्याचे रेखाटून या योजनांना जाहिरातबाजी असे संबोधले आहे.देशाने जी प्रगती केली, त्याचे सर्व श्रेय आजवरच्या सरकारांना जाते, हे मी अभिमानाने कबूल करतो.तसे मी लाल किल्ल्यावरूनही सांगितले.पण तेवढा उदारपणा तुम्ही कधी दाखवला का ? असे नरेंद्र मोदी म्हणत असतानाच, . “अहो कधीतरी आमच्याही छकुल्याचे ( मोदी यांच्या योजना ) कौतुक करा ना” असे पंतप्रधान मोदी हे माजी पंतप्रधान यांना म्हणत आहेत तर “मोदीजी , नक्की केले असते पण त्यात नुसताच पेंढा भरलाय….असे उत्तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देत आहेत असे व्यंगचित्र रेखाटून राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

Previous article२१ फेब्रुवारीला राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत
Next articleआज सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कर्जमाफीच्या कामासाठी सुरु राहणार !