नाकर्त्या सरकारमुळे मंत्रालयात आत्महत्येचा काऊंटडाऊन सुरु
धनंजय मुंडे
कोपरगाव : महाराष्ट्राचे मंत्रालय सध्या आत्महत्यालय म्हणून चर्चेत आले आहे. आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने मंत्रालयात जाळ्या लावल्या आहेत. याऐवजी सरकारने आपला कारभारच ‘नीटनेटका’ केला असता तर आज सेफ्टी ‘नेट’ लावण्याची वेळ आली नसती. जनतेचे प्रश्न सोडवून न शकणाऱ्या या नाकर्त्या सरकारमुळेच मंत्रालयात एकापाठून एक आत्महत्येचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. ही या महाराष्ट्राला लाजिरवाणी अशी गोष्ट असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येवला येथील सभेत केली.
उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या दिवशी येवला येथे सहाव्या सभेला ते संबोधित करत होते. मंत्रालयात आज एका महिलेने आत्महत्येचा प्रयन्त केला त्या संदर्भात ते बोलत होते. भाजप सरकारने काही उल्लेखनीय काम केले असेल तर ते फक्त लोकांचे आधार कार्ड लिंक करण्याचे केले. त्यातून फक्त तीन लोक वाचले ललित मोदी, विजय मल्ल्या आणि आता नीरव मोदी. यांनी कुठेही स्वतःचे आधार कार्ड लिंक केले नव्हते काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.