“यमका” साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय ?
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिले असून,उगाच “यमका” साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय,तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले असे प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बॅक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी आडनावाचा फायदा घेत नीरव मोदीच्या नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. ललित मोदी आणि निरव मोदी हे दोघे देश सोडून पळून गेले.तिसरा येऊन जाऊन असतो असे ट्विट त्यांनी केले होते. मोदी”या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सूचले… तेव्हाच कळले आता “शिमगा” जवळ आलाय! तसा वर्षभरच यांचा शिमगाच असतो म्हणा!! उगाच “यमका” साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय,तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले. असे ट्विट आज करत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे..










