सत्तेत जर गेंडा असेल तर चाबकाने त्याचं करायचं काय ?

सत्तेत जर गेंडा असेल तर चाबकाने त्याचं करायचं काय ?

धनंजय मुंडे

नाशिक ( निफाड ) : आज बऱ्याच दिवसाने चाबुक हातात आला असून या चाबकाला एकवेळ बैल बुजतो आणि कधी वाघ समोर आला तर चाबकाला घाबरतो परंतु सत्तेत जर गेंडा असेल तर या चाबकाने त्याचं करायचं काय असा सवाल विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी निफाडच्या जाहीर सभेत जनतेला केला.

आज हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा दिवस आणि निफाडमध्ये जाहीर सभा पार पडली.यावेळी माजी आमदार दिलीप बनकर यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी चाबुक भेट दिला.त्या चाबकाचा धागा पकडत धनंजय मुंडे यांनी चाबकाचे फटकारे सरकारवर ओढले.या देशात आणि राज्यात महागाईचा आगडोंब उसळला आहे.रेशनवरील डाळ,साखर,तांदुळ,रॉकेल जनतेचं सरकारने बंद केलं आहे.आणि दुसरीकडे जो मका आपण गाई-गुरांना खायला घालतो तो मका हे मोदी-फडणवीस आपल्याला खावू घालत आहेत.त्यामुळे जनतेने काय करायचं याचा विचार करायला हवा असेही मुंडे म्हणाले.

मुंडे आपल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा श्रीपाद छिदम याचा समाचार घेतला.आज त्याला अटक कराल,त्याला पक्षातून निलंबितही केले आहे,त्याला आतमध्ये काही दिवस ठेवाल. परंतु महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या त्या छिदमची जीभच छाटली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.कोणपण उठून काहीही बोलत आहे. आणि त्याविरुध्द आंदोलन करणाऱ्या आमच्या लोकांवर पोलिस कारवाई करत आहेत. पोलिसांना मी सांगू इच्छितो,आमच्या लोकांना त्रास देवू नका,मौका सभी को मिलता है,वेळ आमचीही येणार आहे हे लक्षात ठेवा.त्यावेळी शोलेमधील धर्मेद्राचा डॉयलॉग आठवा,चुन चुन के मारेंगे असेही मुंडे यांनी भाषणात स्पष्ट केले.

Previous article“यमका” साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय ?
Next article…..तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here