…..तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही

.….तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही

विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

बुलडाणा : जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदण यांच्या नेतृत्वात ७०० विद्यार्थ्यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरु केला आहे. राणा चंदन यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी भेट देवून राणा चंदन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा दौऱ्यावर असतानाही हजारो विद्यार्थ्यांच्या अन्नग्रह आंदोलनाकडे दुर्लक्ष केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे चार दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून ते बुलडाण्यात आले असता त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, सरकारने १२ हजार पोलीस शिपाई पदाची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येवून या सरकारला चार वर्ष झालीत मात्र राज्यात कोठेही पोलीस भरती झाली नाही. पोलीस विभागात पोलीसांच्या हजारो जागा रिक्त आहे. रिक्त जागांमुळे पोलीसांवर ताण येत आहे. हे सरकारला दिसत नाही का? असा सवाल उपस्थित करुन तातडीने पोलीस शिपाई पदाची भरती घेवून तरुणांना न्याय द्यावा अन्यथा राज्यभरातील बरोजगार तरुण रस्त्यावर उतरतील असा इशारा . रविकांत तुपकर यांनी आपल्या खास वऱ्हाडी शैलीत आक्रमक भाषण करीत सरकारवर चौफेर टिका केल्याने विद्यार्थी अक्षरश: पेटून उठले व जर या सरकारने वेळीच जागा भरल्या नाहीत तर भाजपला मतदान करायचे नाही अशी तुपकरांच्या उपस्थितीत शपथ घेतली.

Previous articleसत्तेत जर गेंडा असेल तर चाबकाने त्याचं करायचं काय ?
Next articleभारतीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचविण्यात आशा भोसले यांचे मोलाचे योगदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here