“हो गयी भूल कमल का फूल” हा विचार लक्षात ठेवा

“हो गयी भूल कमल का फूल” हा विचार लक्षात ठेवा

सुनिल तटकरे

नाशिक ( सटाणा) : हो गयी भूल कमल का फूल हा विचार लक्षात घेवून या सरकारला वठणीवर आणण्याचा निर्धार करुन कामाला लागूया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना नाशिकचा जास्तीत जास्त भाग ओलिताखाली आणला होता. मी जलसंपदा मंत्री म्हणून काम करत असताना नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावले होते. नार-पार, दमणगंगाचे पाणी गुजरातला जावू देणार नाही असा निर्धार आज करुया त्यासाठी आपल्याला पुन्हा हल्लाबोल करावा लागला तरी तो आम्ही करु असे आश्वासनही तटकरे यांनी दिले.

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यासाठी हल्लाबोल करण्याची गरज आहे. जसा रात्री नंतर पुन्हा दिवस उजाडतो. त्याप्रमाणे भाजपची सत्ताही जाणार आहे असेही तटकरे म्हणाले.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुंबईत आगमन
Next articleनवी मुंबई विमानतळ देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ होणार