नवी मुंबई विमानतळ देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी मुंबई : १९९७ मध्ये अटलबिहारी सरकारने नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न पाहिले होते.नंतरच्या सरकारने काहीही केले नाही.हा प्रकल्प केवळ कागदावर होता.आम्ही सर्व अडथळे दूर करून या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. हे देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सांगितले.
देशात यापूर्वी एव्हिएशन पाॅलिसी नव्हती.आमच्या सरकारने ती पाॅलिसी आणली असे सांगतानाच लटकाना अटकाना पटकाना हे पूर्वीच्या सरकारचे धोरण असे टीका त्यांनी काॅग्रेसवर केली.पहिला टप्पा डिसेंबर २०१९ मध्ये तर २०२५ पर्यंत तिसरा टप्पा पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन सोहळ्यात दिली.
दरम्यान ओवळा फाटा गांव येथे शिवसेना आमदार आणि उरण तालुकप्रमुख परेश पाटील आणि कार्यकर्ते यांना काळे झेंडे दाखवल्यामुळे केले अटक करण्यात आली.










