चौकीदार बदलले पण हेही झोपा काढत आहेत !

चौकीदार बदलले पण हेही झोपा काढत आहेत !

मुंबई –  हिरे व्यापारी निरज मोदी याने  पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातुन निशाणा साधला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातुन रेखाटलेले व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.या व्यंगचित्रात मनसेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता.त्या भाषणांचा धागा पकडत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. आज प्रसिध्द केलेल्या व्यंगचित्रामध्ये मद्यसम्राट विजय मल्ल्या, घोटाळेबाज हिरे व्यापारी निरज मोदी यांच्यासारखे घोटाळेबाज बँका लुटून पळत असताना दिसत आहेत. स्वत:ला चौकीदार समजणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अरुण जेटली  गाढ झोपलेले दिसत आहे. तर सर्वसामान्य ठेवीदार चिंतेत आहेत असे दर्शविले आहे.

Previous articleदेशातील पहिले आर्टीफिशिअल इंटेलिजेंस इन्स्टीट्यूट राष्ट्राला समर्पित
Next articleमाजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन