जोपर्यंत धर्मा पाटलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही

जोपर्यंत धर्मा पाटलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही

सुनिल तटकरे

धुळे : शेतकरी धर्मा पाटील यांच्याबाबतीत सरकार किती क्रूरपणे वागू शकते हे त्यांच्या आत्महत्येनंतर लक्षात आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोपर्यंत धर्माबाबाला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सरकारला दिला आहे.

मंत्रालयामध्ये आपल्या न्याय हक्कासाठी लढताना सरकारच्या व्यवस्थेचा बळी ठरलेल्या धुळे येथील धर्मा पाटील यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भेट देवून त्यांच्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी असल्याचा विश्वास दिला आणि त्याचे सांत्वन केले.

Previous articleराहुल गांधी यांचे शिवाजी महाराजांना मराठीतून अभिवादन 
Next articleशिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक केव्हा होणार?