गोडबोल्यापेक्षा कडक बोलणारा माझा दादाच चांगला

गोडबोल्यापेक्षा कडक बोलणारा माझा दादाच चांगला

अमळनेर : गोड बोलून मोठी स्वप्न दाखवणाऱ्यांकडून आता सावध रहा. एक वेळ कडू बोलणारा चालेल पण गोड बोलणारा नको. जसा आमचा दादा कडक बोलतो पण खरं बोलतो. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर आता दादाच हवा, असे प्रतिपादन करून सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या वृत्तीवर टीका करत अजितदादांचे कौतुक केले.

मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीजी दोन मिनिटे महाराष्ट्राबद्दल बोलले आणि उरलेले २२ मिनिटे देशातील इतर गोष्टींवर बोलत मोठ मोठी स्वप्ने दाखवत बसले. बेरोजगार, कर्जमाफी, हमीभाव याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. आता आपल्याला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, असं इशारा देत त्या पुढे म्हणाल्या,गोड बोलणार्‍या पेक्षा थोडा कडक बोलणारा, शिस्तप्रिय असा माझा दादाच चांगला आहे. खरं बोलल्यामुळे दादा कधी कधी अडचणीत ही येतो, पण खोटं बोलत नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे कौतुक केले.

Previous articleसुप्रियाताई म्हणतात माझी आई सामान्य गृहिणी, महागाईची तिलाही झळ
Next articleमुक्त संवाद…राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत