मुक्त संवाद…राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत
पुणे : शोध मराठी मनाचा..जागतिक मराठी सम्मेलनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची २१ फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी अभूतपूर्व मुलाखत घेणार आहेत. पुण्यातल्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मैदानावर ही बहुप्रतीक्षित मुलाखत सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या निमित्ताने यापूर्वी ही होणारी मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती. आता ही मुलाखत बुधवारी २१ फेबुवारी होत आहे.मुक्त संवाद दोन पिढ्यांचा या मध्ये शरद पवार यांच्या ५० वर्षाच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासावर मनसेचे अध्यक्ष मुलाखत घेणार आहे.यावेळी शरद पवार यांच्या ५० वर्षांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा , सांस्कृतिक प्रवासाचा सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या बहुप्रतीक्षीत मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.