भाजप नेहमीच चांगल्या नेत्यांचा कार्यक्रम करते

भाजप नेहमीच चांगल्या नेत्यांचा कार्यक्रम करते

सुप्रिया सुळे

चोपडा : एखादा चांगला नेता असेल तर त्याची राजकारणातील कारकिर्द कशी संपवावी, हे भाजपला चांगले माहित आहे. सध्या काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला भाजपने आपल्यात घेतले आणि आता झुलवत ठेवले आहे. याआधी भाजपने जळगावमधील स्वतःच्या नेत्याचाही असाच कार्यक्रम केला होता, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून, आज चोपडा येथे तेराव्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसच्या त्या नेत्याचे नाव न घेता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजप नेहमीच चांगल्या नेत्यांचा कार्यक्रम करते. सर्वात आधी त्यांनी जळगावमधील स्वतःच्या पक्षातील नेत्याचाही कार्यक्रम केला होता. खरं तर तो जळगावचाच अपमान होता.जळगावच्या स्थानिक राजकारणावर बोलताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीत आयाराम – गयारामांना आता स्थान दिले जाणार नाही. संधी साधूंना आता दूर करुन पक्षासाठी प्रामाणिक काम करणार्‍यांना संधी दिली जाईल.

Previous articleमुक्त संवाद…राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत
Next articleतुम्हाला आमचे शेतकरी चोर वाटतात काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here