मोर्चामध्ये सहभागी होणा-या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई

मोर्चामध्ये सहभागी होणा-या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई  :  विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने येत्या २२ फेब्रुवारी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. कार्यालयीन वेळेत या होणा-या महामोर्चामध्ये भाग घेणे हे गैरवर्तणूक ठरविण्यात येवून, कर्मचा-याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्य सरकारच्यावतीन आज परिपत्रक काढून देण्यात आला आहे.
आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी येत्या २२ फेब्रुवारीला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीन मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. यामहामोर्चामध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सामील होण्याची शक्यता गृहीत धरून कार्यालयीन वेळेत या महामोर्चामध्ये सहभाग घेतल्यास गैरवर्तणूक समजण्यात येवून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारच्यावतीने आज परिपत्रक काढून देण्यात आला आहे.

Previous articleगारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? 
Next articleराज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी गुंतवणूकीचे करार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here