राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी गुंतवणूकीचे करार

राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी गुंतवणूकीचे करार

मुख्यमंत्री

मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स २०१८ च्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपये गुंतवणुकीचे ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून ३६ लाख ७७ हजार १८५ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन २०१८ जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप आज झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी रिलायन्स उद्योग समूहाबरोबर ६० हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या तसेच राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘सहभाग’ या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, मॅग्नेटिक महाराष्ट्रला प्रचंड यश मिळाले आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या यशस्वीते विषयी मुख्यमंत्री म्हणाले की, एकूण ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक उद्योग क्षेत्रात ५ लाख ४८ हजार १६६ कोटी एवढी होणार असून गृह निर्माण क्षेत्रात ३ लाख ८५ हजार तर ऊर्जा क्षेत्रात १ लाख ६० हजार २६८ कोटी गुंतवणूक होणार आहे. शासनाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचे १०४ सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून ३ लाख ९० हजार ४०९ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २ लाख ६ हजार २६६ रोजगार निर्मीती होणार आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संरक्षण आणि हवाई उद्योगासाठी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
आज रेल्वेसोबत झालेल्या ६०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे लातूर येथे सुमारे 350 एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या भागात १५ हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे. तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प एकूण २ हजार हेक्टर जागेवर तयार करण्यात येत आहे. तेथे मेट्रो कोच निर्मिती होणार आहे. मेट्रोचे हे डब्बे देशाबरोबरच जागतिक स्तरावर देखील पाठविण्यात येतील. या प्रकल्पामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद, या जिल्ह्यांचे भाग्य उजळणार आहे. मराठवाडा भागात गेल्या अनेक वर्षात कुठलाही मोठा प्रकल्प आला नव्हता. रेल्वे सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिताला चालना मिळणार आहे.राज्याच्या गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदूरबार यासारख्या औद्योगिक दृष्ट्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सहभाग’ वेबपोर्टलच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) वापर सामाजिक विकासासाठी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणाले की, महाराष्ट्राने देशाच्या विकासात
महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. केंद्र शासनाने २००४ ते २०१४ या पाच वर्षात ५ हजार ८५७ कोटी रुपये रेल्वे विकासासाठी महाराष्ट्रात गुंतविले होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत २४ हजार ४०० कोटी रुपये महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहेत. लातूरमध्ये सुरु होणारा रेल्वे कोच निर्मिती कारखाना अवघ्या एका बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी लागणारी जमिन देखील तातडीने हस्तांतरित करण्यात आली. या गतिमान निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी निर्माण होणारे मेट्रोचे कोच हे देशातच नव्हे तर जागतिकस्तरावर पाठविण्यात येतील. मेट्रोच्या कोचला ५० टक्के मागणी ही अवघ्या महाराष्ट्रातूनच होते, असेही गोयल यांनी सांगितले.
उद्योग मंत्री देसाई म्हणाले की, मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्सचा आज समारोप असला तरी यामध्ये असलेले प्रदर्शन पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात आठ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी दोन वर्षात ६१ टक्के सामंजस्य करार प्रत्यक्षात कार्यरत झाले. यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्सच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १३ विविध धोरणे जाहीर केली आहेत. महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असल्याचे सांगत देसाई यांनी गुंतवणुकदारांचे आभार मानले.

मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018 मधील गुंतवणूक

गृह निर्माण – ७ प्रस्ताव ३ लाख ८५ हजार गुंतवणूक
कृषी – ८ प्रस्ताव १० हजार २७८ कोटी गुंतवणूक
पर्यटन व सांस्कृतिक – १७ प्रस्ताव ३ हजार ७१६ कोटींची गुंतवणूक
ऊर्जा – १७ प्रस्ताव १ लाख ६० हजार २६८ कोटींची गुंतवणूक
इतर – ४०८ प्रस्ताव ९५ हजार कोटींची गुंतवणूक
कौशल्य विकास – ११३ प्रस्तावातून १ लाख ७६७ रोजगार निर्मिती
उच्च शिक्षण – १२ प्रस्ताव, २ हजार ४३६ कोटी गुंतवणूक
महाआयटी – ८ प्रस्ताव ५ हजार ७०० कोटी गुंतवणूक
उद्योग क्षेत्र – ३५१६प्रस्ताव, ५ लाख ४८ हजार १६६ कोटींची गुंतवणूक
असे एकूण ४१०६ प्रस्तावातून १२ लाख १० हजार ४६४ कोटींची गुंतवणूक

प्रमुख औद्योगिक प्रकल्प

रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड – ६० हजार कोटी
व्हर्जिन हायपरलूप वन – ४० हजार कोटी
थ्रस्ट एअरक्राफ्ट क्लस्टर (अमोल यादव) – ३५ हजार कोटी
जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल – ६ हजार कोटी
ह्योसंग कंपनी – १२५० कोटी
महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल – ५०० कोटी

अविकसित भागातील महत्त्वाचे प्रकल्प

लॉइड मेटल अँड एनर्जी, गडचिरोली – ७०० कोटी
जिनस पेपर अँड बोर्ड, नंदूरबार – ७०० कोटी
टेक्नोकार्ट इंडस्ट्री, अमरावती – १८३ कोटी
इंडिया ॲग्रो अनाज लिमिटेड, नांदेड – २०९ कोटी
शिऊर ॲग्रो लिमिटेड, हिंगोली – १२५ कोटी

मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प

कॉयर क्लस्टर, सिंधुदुर्ग – ७.५६ कोटी
मेगा लेदर क्लस्टर, रायगड – ५०० कोटी
चित्रावारली फाऊंडेशन आर्ट अँड क्राफ्ट क्लस्टर – पालघर – १ कोटी
इलेक्ट्रॉनिक क्लस्टर, नागपूर – ५ कोटी
गोल्ड ज्वेलरी क्लस्टर, अहमदनगर

महत्त्वाचे गृहनिर्माण प्रकल्प

क्रेडाई महाराष्ट्र – १ लाख कोटी (पाच लाख परवडणारी घरे)
नारेडको – ९० हजार कोटी (३ लाख परवडणारी घरे)
खलिजी कमर्शियल बँक अँड भूमी राज – ५९ हजार कोटी (२ लाख परवडणारी घरे)
पोद्दार हाऊसिंग – २० हजार कोटी (१ लाख परवडणारी घरे)
कन्सेप्टच्युअल ॲडव्हायजरी सर्व्हिस – २५ हजार कोटी (१ लाख परवडणारी घरे)

वस्त्रोद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प

ह्योसंग – १२५९ कोटी
निर्वाण सिल्क – २९६ कोटी
पलक इंडस्ट्रिज, अमरावती – २५ कोटी
सुपर ब्ल्यू डेनिम – १२५ कोटी
व्हेरिटो टेक्स्टाईल अमरावती – २५ कोटी
ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प
अदानी ग्रीन एनर्जी – ७ हजार कोटी
रि न्यू पॉवर व्हेंचर – १४ हजार कोटी
टाटा पॉवर – १५ हजार कोटी
सॉफ्ट बँक एनर्जी – २३ हजार कोटी
युनिव्हर्जी थिंक ग्रीन – २४ हजार कोटी

कृषी व विपणन क्षेत्रातील प्रकल्प

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हवामान आधारित कृषी प्रकल्प – ४ हजार कोटी
आयसीआरआयएसएटी, हैद्राबाद, किसानमित्र – विदर्भातील अकरा जिल्ह्यात ६६
कोटी गुंतवणूक
रॉयल ॲग्रो फूडस् – १४०० कोटी
पलासा ॲग्रो – २७०० कोटी

फ्युचरिस्टिक सेगमेंट

व्हर्जिन हायपरलूप वन – ४० हजार कोटी
रिलायन्स इंडस्ट्रिज – ६० हजार कोटी
आयएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल – ६ हजार कोटी
महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेइकल – ५०० कोटी
लॉजिस्टिक मधील महत्त्वाचे प्रकल्प
देवीसिटी लॉजिस्टिक पार्क नागपूर – ४२४ कोटी
राज बिल्ड इन्फ्रा – ३ हजार कोटी
लॉजिस्टिक पार्क, पुणे – १०० कोटी
थेट परकीय गुंतवणुकीचे महत्त्वाचे प्रकल्प
कॅरियर मिडिया इंडिया प्रा. लि. – ३०० कोटी
एमर्सन प्रोसेस मॅनेजमेंट – ८१५ कोटी
आयएलजीआयएन ग्लोबल इंडिया – ७५० कोटी
एलजी इलेक्ट्रॉनिक्स – ३५० कोटी
ओव्हनस कॉर्निंग इंडिया – १०५० कोटी
पेरी विर्क – ७२८ कोटी

पायाभूत सुविधांमधील प्रकल्पामध्ये शासनाची गुंतवणूक

वाहतूक आणि बंदरे – ४८ प्रकल्प, ५९ हजार ३२ कोटींची गुंतवणूक
सार्वजनिक बांधकाम – ५ प्रकल्प, १ लाख २१ हजार ५० कोटींची गुंतवणूक
मुंबई महानगरपालिका – १८ प्रकल्प, ५४ हजार ४३३ कोटींची गुंतवणूक
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण – ३० प्रकल्प, १ लाख ३२ हजार ७६१ कोटी
नगर विकास – ३ प्रकल्प, २३ हजार १४३ कोटी

Previous articleमोर्चामध्ये सहभागी होणा-या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई
Next articleमाझ्या राजाचा मान नाही ठेवायचा निदान अपमान करण्याचा अधिकार नाही 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here