रविकांत तुपकरांनी घेतली खा.छ. उदयनराजे भोसले यांची भेट

रविकांत तुपकरांनी घेतली खा.छ. उदयनराजे भोसले यांची भेट

तासाभराच्या भेटीत राजकीय विषयावर खलबते

सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. सातारा येथील जलमंदिर या महाराजांच्या निवासस्थानी ही भेट घडून आली. तब्ब्ल तासभर चाललेल्या उभय नेत्यांच्या भेटीत विविध राजकिय विषयावर चर्चा झाली तथापि या चर्चेचा संपूर्ण तपशिल कळू शकला नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते स्वाभिमानीची मुलुख मैदानी तोफ म्हणुन ओळखल्या जाणारे राज्याच्या वस्त्रोदयोग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे अलीकडे पश्चिम महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर दौरे सूरू आहेत. स्वाभिमानीचे नेते खा. राजू शेटृी यांनी माढा लोकसभा मतदार संघासाठी अप्रत्यक्षपणे रविकांत तुपकर यांच्या नावाचा सुतोवाच केला होता. तेव्हापासून तुपकरांचे या मतदार संघात दौरे वाढलेले आहेत. सध्या रविकांत तुपकर हे मागील आठ दिवसापासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जिजाऊ जन्मोत्सावाच्या कार्यक्रमासाठी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले सिंदखेडराजाला जिजाऊ सृष्टीवर आले होते. त्यावेळी रविकांत तुपकर यांचे बेधडक व आक्रमक शैलीतील करारी भाषण झाले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांची जिजाऊ सृष्टीवर भेट झाली होती. येत्या २४ फेब्रुवारी रोजी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले महाराज यांचा वाढदिवस असून हा वाढदिवस सर्वपक्षीय नेत्यांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. या पार्श्वभुमीवर रविकांत तुपकर यांनी छत्रपती महाराजांच्या सातारा येथील “जलमंदिर राजवाडा” या निवासस्थानी जावून महाराजांची भेट घेतली.

शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी वस्त्रोदयोग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याबद्ल महाराजांनी तुपकरांचे त्यांच्या खास शैलीत अभिनंदन केले. बुलडाणा जिल्हयातील एका छोटयाशा खेडयातून कोणतीही राजकीय पार्श्वभुमि नसलेले पण आपल्या कर्तृत्वाच्या व नेतूत्वाच्या जोरावर आख्या महाराष्ट्रात स्वाभिमानीची मुलुखमैदानी तोफ म्हणुन नावारूपाला आलेले रविकांत तुपकर आणि श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले महाराज या दोन नेत्यांची तब्ब्ल एक तास चर्चा झाली. या संपूर्ण चर्चेत राजकारण हाच विषय होता. तथापि या चर्चेचा नेमका तपशिल बाहेर उवू शकला नाही. दरम्यान या चर्चेचेनंतर रविकात तुपकर यांनी सुरू केलेल्या माढा लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यात ठिकठिकाणी श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले महाराजांच्या कार्यकर्ते व मित्रमंडळाकडून रविकांत तुपकर यांचे जल्लोषात स्वागत झाले. विशेषत: माण, खटाव, फलटण या परिसरात श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले महाराज मित्रमंडळाच्या वतीने ठिकठिकाणी रविकांत तुपकर यांचे विशेष स्वागत केले. रविकात तुपकर आणि श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. या संदर्भात रविकांत तुपकर यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न् केला असता त्यांनी ही भेट केवळ वैयक्तीक होती. राजकीय विषयावर भाष्य करण्यास त्यांनी टाळले.

Previous articleभाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राची परिस्थिती मॅग्नेटीक नाही तर पॅथेटीक झाली आहे
Next articleअस्मिता योजनेमुळे बचतगटांना मिळणार रोजगार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here