राज्य सरकारी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा

राज्य सरकारी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य शासकीय कर्मचारी आज गुरूवारी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढमार आहेत.कर्मचा-यांनी आपल्या मागण्यासाठी गेली दोन वर्ष आंदोलने केली मात्र सरकारने दुर्लक्ष करीत असून सरकारने सकारात्मक धोरण न अवलंबल्यास बेमुदत संपाचा इशारा बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने दिला आहे.

प्रलंबित मागण्याबाबत शासनाचा नकारात्मक धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध सरकारी कर्मचारी संघटना आज गुरूवारी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने गेल्या २ वर्षापासुन प्रमुख मागण्यांसाठी आंदोलने केली. मात्र सरकार मागम्यांकडे दुर्लक्ष करीत असून, शासनाने सकारात्मक धोरण न अवलंबिल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा बॉहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिला आहे. मुंबईसह राज्यात अनेक द्वारसभांतून शासनाच्या नकारात्मक धोरणाला विरोध करण्यासाठी समन्वय समितीच्या माध्यमातून कर्मचारी एकत्रित आले असून, या आंदोलनाचे दूरगामी परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने वेळीच कर्मचा-यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक धोरण अवलंबिले नाही तर संघर्ष अटळ ठरेल, असे मत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक र.ग.कर्णिक यांनी सांगितले.

Previous articleअस्मिता योजनेमुळे बचतगटांना मिळणार रोजगार
Next articleमी नरेंद्र मोदींचा राजकीय गुरू नाही !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here