दोषी असेल तर सरकार तुरुंगात का टाकत नाही !

दोषी असेल तर सरकार तुरुंगात का टाकत नाही !

एकनाथ खडसेंचा सवाल

अमळनेर : मी गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात आहे.माझ्यावर झालेला अन्याय हा राज्यातील जनतेला माहीतच असून,मी दोषी असेल तर सरकार मला तुरुंगात का टाकत नाही असा सवाल माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

अमळनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या ‘मॅग्नेटिक’ महाराष्ट्र कार्यक्रमाचे अभिनंदन करतो असे सांगत ,त्यामधिल १५ लाख कोटी पैकी उत्तर महाराष्ट्राला एका दमडीचाही प्रकल्प मिळाला नाही असे स्पष्ट करीत हा अन्याय उत्तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही असा इशारा खडसे यांनी दिला. आजच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी येऊ नये म्हणून काही जणांनी फोन केले. जिवाभावाची मंडळी असल्याने आपण या कार्यक्रमाला आलाच. मी तुमच्या भरवशावर आहे. पाय चाटणारे आज कुठे आहेत.हे तुम्हाला माहिती आहे.अमळनेर तालुक्यात आज काय परिस्थिती आहे.खंडण्या गोळा करा,अधिका-यांचा मारा अशा घटना घडत आहेत.अमळनेरचे भुसावळ होत आहे अशी टिकाही त्यांनी केली.

 

 

 

 

 

 

 

Previous articleमार्च २०१९ पर्यंत मुंबई – गोवा मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करणार!
Next article“जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे” छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here