राज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी मतदान

राज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी मतदान

नवी दिल्ली : येत्या एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या एकूण ५८ राज्यसभेच्या जागेसाठी २३ मार्च रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातुन एकूण सहा सदस्यांची मुदत संपत आहे.निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रमाचीआज घोषणा करण्यात आली असून, कार्यकाळ संपत असलेल्या एकूण ५८ सदस्यांच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी येत्या २३ मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रामधील सहा जागांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून वंदना हेमंत चव्हाण( राष्ट्रवादी ) डी.पी.त्रिपाठी ( राष्ट्रवादी)
रजनी पाटील (काँग्रेस),अनिल देसाई  ( शिवसेना),राजीव शुक्ला ( काँग्रेस)
अजयकुमार संचेती (भाजप) या राज्यसभा सदस्यांची मुदत संपत आहे.

राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे

५ मार्चला अधिसूचना जारी होणार
१२ मार्च उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख
१३ मार्च अर्जांची छाननी
१५ मार्च अर्ज मागे घेण्याची मुदत
२३ मार्च मतदान व मतमोजणी

Previous article“जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे” छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र
Next articleकायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याची विरोधकांची रणनीती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here