अस्मिता फंड ‘ ला राज्यभरातून लोकांचा वाढता प्रतिसाद

अस्मिता फंड ‘ ला राज्यभरातून लोकांचा वाढता प्रतिसाद

पंकजाताई मुंडे यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक

बीड जिल्हयातील सरपंचही स्पाॅन्सरशिपसाठी सरसावले

मुंबई : ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना पांच रुपयांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या ‘अस्मिता निधी’ ला ( स्पाॅन्सरशीप ) नागरिकांचा राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना अवघ्या पांच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या ग्रामविकास विभागाच्या अस्मिता योजनेचा शुभारंभ पुढील महिन्यात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी होणार आहे. या योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे आठ पॅडचे एक पाकीट पांच रुपयांत मिळणार आहे. ही सवलत अस्मिता कार्डधारक मुलींना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सात लांख मुलींना अस्मिता कार्ड दिले जातील. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना पांच रुपयां प्रमाणे विक्री केलेल्या पाकीटांच्या संख्येच्या प्रमाणात प्रति पाकीट १५ रू. अनुदान सरकार महिला बचतगटांना देणार आहे.

पंकजाताई मुंडे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मोबाईल अॅप, डिजीटल अस्मिता कार्डच्या माध्यमातून या योजनेत पूर्ण पारदर्शकता राखली जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी लोक सहभागाचे महत्व लक्षात घेऊन ना. पंकजाताई मुंडे यांनी ‘अस्मिता फंड’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. यासाठी कुणीही व्यक्ती मुलीच्या सॅनिटरी नॅपकिन साठी अस्मिता स्पाॅन्सर ( प्रायोजक) होवू शकतो. यासाठी https://mahaasmita.mahaonline.gov.in या वेब
पोर्टलवरून कुणालाही आपले योगदान देता येईल.

अस्मिता फंडाचा नुकताच शुभारंभ करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरासाठी ५० मुलींना तर महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी १५१ मुलींना वर्षभरासाठी सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी ऑनलाईन रक्कम वर्ग केली. ग्रामीण भागातील मुलींसाठी योगदान म्हणून त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला राज्यातील विविध व्यक्ती, संस्था तसेच सर्व स्तरातील लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत दोन हजाराहून अधिक मुलींसाठी लोकांनी यात आपले योगदान दिले आहे.

बीडच्या सरपंचही सरसावल्या

अस्मिता फंडची सरपंचांमधून पहिली स्पाॅन्सरशिप घेण्याचा मान खंडाळा ता. बीड येथील सरपंच स्मिता मोहन चौरे यांना मिळाला. त्यांनी वरील वेब पोर्टल वरून पांच मुलींना वर्षभरासाठी सॅनिटरी नॅपकिन साठी ९२९ रू. ऑनलाईन भरणा करून ग्र आपले योगदान दिले. त्यांचा हा आदर्श इतर सरपंचांनी देखील घेतल्यास ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

Previous articleफसव्या सरकारचे ‘काउन्ट डाऊन’ सुरु
Next articleअर्थसंकल्पीय अधिवेशनात १६ विधेयके मांडणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here